भिवंडीत बालदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा, ३५० विद्याथ्यांचा सहभाग
भिवंडी : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण देशभरात बाल दिवस साजरा करण्यात येत असतो.यानिमित्ताने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय विद्यार्थांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करून बाल दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.शाळेतील एक दिवस हा लहान विद्यार्थांचा म्हणून तालुक्यातील टी.ए.पाटील इग्लिश मिडियम स्कूल पडघा येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करून बाल दिवस साजरा करण्यात आला.या स्पर्धेत ३५० विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना चित्र रेखाटायला सांगितले होते.लहान मुले आपल्या देशाचे उद्याचे भविष्य घडविणारे विद्यार्थी आहेत.म्हणून हा दिवस त्यांच्यासाठी समर्पित करण्यात आला आहे.तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.तसेच समतानगरच्या जि.प.मराठी शाळेतही बाल दिवस साजरा करण्यात आला.बाल दिवसानिमित्त अनेक शाळांमध्ये विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले.बाल दिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी कपडे परिधान करण्याची संधी मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य अधिक फुलले होते.