भिवंडी – वाडा रोडवर भरधाव ट्रकच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार 
भिवंडी :   भरधाव वेगात आलेल्या ट्रकची जोरदार ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोघेही तरुण ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भिवंडी वाडा रोडवरील विश्वभारती फाटा येथे  घडलीय.  बाबा मेहबूब शेख ( २४) आणि शाहरुख रज्जाक शेख ( २३ रा. नवीवस्ती ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नांवे आहेत. हे युवक नातेवाईकांच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन महापोली येथील नातेवाईक ,मित्र आदींना निमंत्रण देण्यासाठी निघाले होते. दोघेही युवक मोटार सायकलवरून विश्वभारती फाटा येथे आले असता समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकची जोरदार धडक दुचाकीला बसली. यात मोटार सायकलवरील बाबा आणि शाहरुख हे दोघे तरुण गंभीर जखमी झाल्याने बाबा हा जागीच मृत्यू पावला तर शाहरुख यास उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.या अपघाताचा तालुका पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *