भिसेगाव -गुंडगे चौक सुशोभिकरणाचे काम पून्हा वादात  

 धर्ती ग्रुप विकासकाच्या सिन्बॉलची जाहिरात !
कर्जत (राहुल देशमुख) :  करोडो रुपये खर्च करून एम.एम.आर.डी.ये.च्या निधीतुन बांधण्यात आलेले भिसेगाव ते गुंडगे सिमेंट कॉन्क्रिट रस्त्याचे काम ठेकेदाराने कामात हलगर्जी केल्यामुळे अगोदरच चर्चेत असताना येथील चौकाचे सुशोभिकरण ही बेकायदेशीर होत असल्याने ते काम त्वरित बंद करण्याची मागणी जनतेतुन होत आहे. कर्जत नगर पालिकेने सुशोभिकरणाचा कुठलाच आराखडा दिलेला नसताना सार्वजनिक मालमत्तेवर विकासकाने आपल्या कन्स्ट्रक्शनचे सिन्बॉल उभारल्याने हे काम पून्हा वादात सापडले आहे.

भिसेगाव -गुंडगे या जोड़ रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या चौकाचे सुशोभिकरणाचे काम पालिकेने सुरू केले आहे.हे काम खाजगी विकासकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.यासाठी लागणारा खर्च विकासक करणार आहे.चौकाच्या शेजारी असणारा धर्ती ग्रुप विकासक हे काम करत आहे .यासाठी असणारा स्ट्रक्चर चा आराखडा पालिकेच्या अभियंताने देणे गरजेचे असताना खाजगी विकासक आपल्या मर्जीनेच त्याच्या धर्ती ग्रुप चा असलेल्या घराच्या सिन्बॉलचे कन्स्ट्रक्शन सिमेंट ने बांधत असून ते बेकायदेशीर आहे.
याबाबतीत कर्जत न.प.मध्ये चौकशी केली असता त्याला आम्ही सुशोभिकरणाचा कुठलाच आराखडा दिलेला नाही.व सार्वजनिक मालमत्तेवर विकासक आपल्या कन्स्ट्रक्शनचे सिन्बॉल उभारू शकत नाही , अशी माहिती नगर अभियंता मयेकर यांनी दिली.तसेच तेथे लावण्यात आलेली राजमाता अहिल्याबाई होळकर हि पाटी देखील बेकायदेशीर लावलेली आहे.तसा कुठलाही ठराव पालिकेत झाला नसल्याचे सांगण्यात  आले. पालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेवर विकासक आपली मनमानी करून बिनधास्त करत असलेल्या कामाकडे पालिकेच्या अधिकार्याचे देखील दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.असे काम नागरीकांच्या हिताचे नसून विकासकाच्या फायद्याचे दिसत आहे.तर ह्या चौकाचे केलेले काम रस्ता बाधित असल्याचे वाटत असून विकासक करत असलेल्या आपल्या धर्ती ग्रुप कन्स्ट्रक्शन सिन्बॉल ची जाहिरातीचे काम थांबवुन , या कामाची चौकशी करावी , अशी मागणी येथील रहिवासी नागरिक व छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे.

One thought on “भिसेगाव -गुंडगे चौक सुशोभिकरणाचे काम पून्हा वादात”
  1. Hey webmaster
    When you write some blogs and share with us,that is a hard work for you but share makes you happly right?
    yes I am a blogger too,and I wanna share with you my method to make some extra cash,not too much
    maybe $100 a day,but when you keep up the work,the cash will come in much and more.more info you can checkout my blog.
    http://makemoneyonlineg.com/2017.php
    good luck and cheers!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *