भिमाशंकर अभयारण्यामध्ये दोनशे फुट दरीत अडकलेल्या प्रवाशाला जीवदान
* भरत शेगडे आणि परिवार यांच्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक

कर्जत. (राहुल देशमुख) : पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील तळवडे येथील अर्जुन जयसिंग वाळंज हा प्रवासी शनिवारी २७ मे रोजी भिमाशंकर अभयारण्यातून खांडस मार्गाने कोकणात येण्यासाठी प्रवास करत असताना रस्ता चुकल्याने भिमाशंकर अभयरण्याला लागून असलेल्या सह्याद्रीच्या कुशितील कर्जत तालुक्यातील रजपे येथील घनदाट जंगलातून मार्ग काढताना त्याचा अचानक पाय घसरल्याने दोनशे फुट दरीत पडला. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास जंगलातून जोरजोरात येणाऱ्या आवाजाचा मागोसा घेण्यासाठी रजपे येथील धनगरवाड्यामधील रहिवासी भरत शेडगे (शिक्षक), पोलिस पाटील अशोक शेडगे आणि सहकार्यांनी आपले घर सोडले. पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना जखमी अवस्थेत अर्जुन वाळंज समोर दिसला त्यानंतर मात्र त्यांनी समयसूचकता दाखवत क्षणाचाही विलंब न लावता डोली करुन जंगलातून धनगरवाड्यापर्यंत आणले. घरी पोहचल्यानंतर त्याचा पाय मोडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जवळील कशेळे पोलिस स्टेशनमध्ये म्हात्रे यांना कळवून अर्जुनाला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यामुळे एका प्रवाशाला जिवदान मिळाल्याने शेगडे परीवाराचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत अतिशय खडतर डोंगर रांगेतून प्रवास करताना एक वाटसरु चुकल्याने अर्जुन जयशिंग वाळंज हा २५ वर्षाचा युवक पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळवडे गावचा रहीवासी आहे.तो कोकण भागात भीमाशंकर ते खांडस या मार्गे प्रवास करत होता. मात्र तो अचानक रस्ता चुकला या अभयारण्यामधून तो थेट रजपे या सह्याद्रीच्या रांगेला असलेल्या डोंगर, दरी पार करत असल्याना प्रवासादरम्यान तो रस्ता चुकला हे त्याला कळलच नाही. तो डोंगराच्या एका खोल दरीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा अचानक तोल गेला व शनिवारी दोनशे फूट दरीत कोसळला व डोंगराच्या मध्य भागी येऊन अडकल्याने बेशुद्ध अवस्थेत पडला. त्यानंतर तो रविवारी पहाटे शुद्धीवर आल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास डोंगर माथ्यावरून कोणाचातरी आवाज येत आहे लक्षात घेऊन धनगर वाड्यावरील शेडगे यांनी सर्व तरुणांना घेऊन पाच तास डोंगर भागात पायपीट करून त्याचा शोध घेतला. शोध घेत असताना तेथील युवक अंकुश शेडगे, पुंडलिक शेडगे, भरत शेडगे, लहू शेडगे, योगेश शेडगे, रघुनाथ शेडगे , पांडुरंग वारे, संजय ठोंबरे, कैलास खडके, सुभाष बांगारी, सुनील हिंदोळे या सर्व ग्रामस्थांनी दोराच्या व खांद्यावरील झोळीच्या साहाय्याने त्याला खाली काढले. वत्यानंतर त्याला जेवण, पाणी देऊन त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर शेजारील पोलीस स्टेशनला कळवून दवाखान्यात उपचारासाठी पोहोचवण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने शेडगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!