पुणे, दि.1: कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन करून पुष्पचक्र अपर्ण केले

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महाराष्ट्राला शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. इतिहासाची पाने पहिली तर आपल्याला पुण्यातही हेच दिसते. कोरेगाव भीमा येथे जे शूरवीर शाहिद झाले. त्या सर्वांना अभिवादन करतो. हा इतिहास पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावा आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी यंदाच्या अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे शासकीय समिती करण्यात आली आहे. त्यामध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश केला जाईल. स्मारकाचा विकास करण्यासाठी जागा संपादित करणे, चांगल्या प्रकारची पार्किंग व्यवस्था आदी सुविधा देण्यास शासनाचे प्राधान्य राहील.

कोरोनाच्या बाबतीत राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाचा नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा संसर्ग वेगाने होतो ही बाब लक्षात घेतली पाहिजे असे पवार म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *