कोरेगाव भीमा हिंसाचाराचे मुंबईसह राज्यात पडसाद : आंबेडकर अनुयायीकडून निषेध 
मुंबई :  पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे किरकोळ वादातून झालेल्या दगडफेक, तोडफोडीचे पडसाद मंगळवारी मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी उमटले. आंबेडकरी जनतेने रस्त्यात उतरून या घटनेचा निषेध केला.
मुंबईतील चेंबूर, गोवंडी, सायन, मुलुंड, कांदिवली, दामूनगर, कल्याण,  मुरबाड, उल्हासनगर,पनवेल आदी परिसरात या घटनेचे पडसाद उमटले. ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरून निषेध करीत होती. अनेक परिसरातील दुकाने, रिक्षा बंद करण्यात आल्या होत्या. चेंबूर नाका येथे सायन पनवेल महामार्गावर महिलानी रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहतूक रोखून धरण्यात आली होती. तसेच राज्यात विविध ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़. औरंगाबाद,उस्मानाबाद,जालना जिल्ह्यांत शहरातील अनेक महाविद्यालये, शाळा बंद करण्यात आल्या आहेत. परभणी शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहेत. हिंगोलीच्या औंढामध्ये बंदची हाक देण्यात आली. कळमनुरी आगाराच्या बसफे-या रद्द केल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!