भीमा-कोरेगाव घटनेची न्यायाधीशामार्फत तर युवकाच्या हत्येची सीआयडी चौकशी करणार – मुख्यमंत्री
मुंबई : भीमा-कोरेगाव घटनेची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल तसेच युवकाच्या हत्येची सीआयडी चौकशी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितलं. तसेच मृत युवकाच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीची दहा लाख रूपयाची मदत देण्यात येणार असल्याचे मुुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
जनतेने व राजकीय पक्षांनी जातीय तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. जनतेनेही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसेच समाजमाध्यमातून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.