भिडे गुरूजींच्या कार्यक्रमाला पेालिसांनी परवानगी नाकारली
मुंबई : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने ७ जानेवारीला मुंबईतील लालबाग येथे संभाजी भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आला होत मात्र कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पेालिसांनी भिडे गुरूजींना परवानगी नाकारलीय. त्यामुळे हे व्याख्यान पुढे ढकलण्यात आलय.
1 जानेवारीला भीमा कोरेगाव हिंसाचाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आंबेडकरी जनतेचा उद्रेक झाला होता, याचवेळी भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात भिडे गुरूजींचा हात असून त्यांना अटक करण्याची मागणी केलीय. त्याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ही परवानगी नाकारलीय. या कार्यक्रमाला जवळपास पाच हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली होती.