भांडूप पोटनिवडणुकीत ५०.६४ टक्के मतदान
मुंबई : भांडूप प्रभाग क्र ११६ च्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी शांततेत मतदार पार पडले. या पोटनिवडणुकीसाठी सुमारे ५०.६४ टक्के मतदान झाले. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. काँग्रेस पक्षाच्‍या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्‍या निधनामुळे रिक्‍त झालेल्‍या जागेवर ही पोटनिवडणूक घेण्यात आली.

सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. मतदानासाठी सात ठिकाणी २९ केंद्र होते सगळयाच केंद्रावर मतदारांची गर्दी होती. संध्याकाळी साडेपाच पर्यंत १९ हजार २६९ मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरूष मतदार १० हजार ५६० तर महिला मतदार ८४३६ समावेश होता. शिवसेनेकडून आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मिनाश्री पाटील तर भाजपतर्फे जागृती पाटील यांच्यात खरा सामना होणार आहे. शिवसेना व भाजप दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. १२ ऑक्‍टोंबर रोजी सकाळी ९ वाजता ‘एस’ विभाग कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *