राजस्थान :राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्माचा यांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे. भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार बनले आणि थेट मुख्यमंत्री बनले आहेत.

राजस्थानमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला १९९ पैकी ११५ जागा पटकावल्या आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र भजनलाल शर्मा यांचे नाव आश्चर्यकारक पुढं आले आहे. राजस्थानमध्ये गेल्या २५ वर्षांपासून मुख्यमंत्रिपद काँग्रेसचे अशोक गेहलोत किंवा भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांच्याकडे आहे. भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार बनले आणि थेट मुख्यमंत्री बनले आहेत

सांगानेर हा जागा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. ही जागा जयपूर जिल्ह्यात येते. येथून पक्षाने विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांना तिकीट नाकारून भजनलाल शर्मा यांना तिकीट दिलं होतं. शर्मा यांनी सांगानेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८ हजार मतांनी पराभव केला. त्यांना एकूण १ लाख ४५ हजार १६२ मते मिळाली.

शर्मा हे भरतपूरचे रहिवासी असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जवळचे मानले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) यांच्यासाठी त्यांनी दीर्घकाळ काम केलं. शर्मा यांनी जयपूरस्थित राजस्थान विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमएची पदवी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *