१७ डिसेंबर मुंबई: गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणार्या कोरोना व्हायरसनंपुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस आणि कोरोनाच्यासंसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट भारतात आल्याचं समोर आलं आहे.
कोविड-१९ चा सबव्हेरियंट व्र्.१ चं पहिलं प्रकरण केरळमध्ये आढळून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनानं ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वृत्तही समोर येत आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, १८ नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणीत ७९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
महिलेनं सांगितलं की, तिला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची सौम्य लक्षणं आहेत आणि ती ण्ध्न्न्घ्D१९ मधून बरी झाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, दरम्यान, केरळचे आमदार केपी मोहनन यांनी शनिवारी कन्नूर येथील पनूर नगरपालिव्ाâा रुग्णालयात कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपायांची पाहणी केली.
सध्या भारतातील कोविड-१९ रुग्णांपैकी ९० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली आहेत आणि होम आयसोलेशनमध्ये आहेत. यापूर्वी, सिंगापूरमधील एका भारतीय प्रवाशालाही व्र्.१ सब-व्हेरिएंट आढळून आला होता. ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून २५ ऑक्टोबर रोजी सिंगापूरला गेले होते. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात किंवा तमिळनाडूमधील इतर ठिकाणी हा स्ट्रेन आढळल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही.
‘भारतात व्र्.१ व्हेरियंटचा इतर कोणताही दुसरा रुग्ण आढळून आलेला नाही.’, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. केरळमध्ये कोविडच्या भीतीनंतर आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी तातडीची बैठक बोलावली. अधिकार्यांना मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच या पार्श्वभूमीवर केरळच्या सीमा बंद केल्या जाणार नसल्याचंही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.