घाटकोपर ( निलेश मोरे ) : बेस्टमध्ये प्रवासादरम्यान प्रवासी विसलेली दोन लाख रूपये असलेली बॅग बेस्टच्या प्रामाणिक वाहकाने परत केले आहे. गोकूळ राठोड अस त्या प्रामाणिक वाहकाचे नाव असून केशव शिरसाठ या प्रवाशाची ती बॅग होती. बहिणीच्या लग्नासाठी त्यांनी ही रक्कम काढून आणली होती. विसरलेली बॅग परत मिळाल्याने शिरसाठ यांना हायसं वाटत, त्यांच्या चेह- यावरही आनंद पसरला.
घाटकोपर स्टेशनहून निघालेली बस क्रमांक 406 मध्ये केशव शिरसाट हे प्रवासादरम्यान आपली काळ्या रंगाची बॅग विसरले. त्या बॅगेत बहिणीच्या लग्नासाठी कामावरून रोख रुपये 2 लाख आणि काही कागदपत्रे होती. बसमधून खाली उतरल्यानंतर त्यांना बॅग विसरल्याचे लक्षात आले मात्र तोपर्यंत बस निघून गेली हेाती बसचा क्रमांकही त्यांना माहित नव्हता. बसचे तिकीट हि त्यांनी फेकून दिले होते. बॅग विसरल्याने शिरसाठ चिंतातूर झाले होते. त्यांनी लागलीच बस डेपोमध्ये धाव घेतली मात्र त्यांच्याकउे कोणतीच माहिती नसल्याने निराश होऊन त्यांना घरी परतावे लागले. मात्र घरी गेल्यानंतर काही वेळातच त्यांना बॅग मिळालयाचे फोन बेस्टमधून आला. शिरसाठ ज्या बसमधून प्रवास करीत होते त्या बसमधील वाहक गोकूळ राठोड यांना ती बॅग मिळाली हेाती. बसमधील प्रवाशांना बॅग विसल्याचे वाहक राठोड यांच्या लक्षात आणून दिले. त्यावळी राठोड यांनी ती बॅग आपल्याकउे घेत डेपोत जाम केली. बॅगेत पैसे आणि कागदप़ असल्याचे निदर्शनास आले. कागदपत्रावर शिरसाठ यांचा नंबर मिळाल्यानंतर त्यांना फोन करून बोलावण्यात आले. त्यांनंतर शिरसाठ यांच्याकडे ती बॅग सुपूर्द करण्यात आली शिरसाठ यांनीही वाहक राठोड यांचे आभार मानले. बॅग उघडल्यानंतर त्यात पैसे असल्याचे निदर्शनास आले. बेस्ट कायद्यानुसार ती बॅग आगारात जमा केली पैशाने माणूस मोठा होत नाही अशी प्रतिक्रिया राठोड यांनी दिली. राठोड यांच्या प्रामाणिकपणाची माहिती समजताच बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी घाटकोपर आगार येथे येऊन राठोड यांचा सत्कार केला. बेस्टचे सर्व कर्मचारी प्रामाणिक आहे म्हणूनच मुंबईकर जनता बिनधास्त प्रवास करते असे कोकीळ यांनी सांगितले . यावेळी एन वार्ड प्रभाग समितीचे अध्यक्ष नगरसेवक सुरेश पाटील , दक्षता समितीचे सदस्य प्रकाश वाणी हे उपस्थित होते .