इंटरनॅशनल ट्रॅव्हल मॅगझीन वंडेर्लस्ट टिप्स पुरस्कृत

“बेस्ट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स २०१९” अवॉर्डस घोषित

कोरिया (अजय निक्ते) : कोरिया येथील सेउल मध्ये नुकत्याच “बेस्ट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स २०१९” या मानांकित स्पर्धा पार पडल्या. या वेळी विविध प्रकारची अवॉर्डस घोषित करण्यात आली असून त्यामध्ये एकूण १८ गटांमध्ये उत्कृष्ट मानांकने जाहिर करण्यात आली.

ही स्पर्धा ख्यातनाम जागतिक ट्रॅव्हल मॅगझीन वंडेर्लस्ट टिप्स यांच्या माध्यमातून पार पडली असून हे मॅगझीन लक्झरी ट्रॅव्हल कम्युनिटी मध्ये नामांकित मॅगझीन म्हणून ओळखले जाते. मॅगझीन च्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि अवॉर्डस ऑर्गनायझिंग कमिटी च्या मुख्य प्रवर्तक क्रिस्टल ह्युअन त्र्यांग , यांनी पुढे सांगितले की , लक्झरी ट्रॅव्हल मार्केट मधील १० सर्वोत्कृष्ट व्यक्तींना आणि १८ आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना या दिमाखदार सोहळ्यात गौरवण्यात आले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत

लिडिंग लक्झरी रिसॉर्ट म्हणून बनयान ट्री लँग , लिडिंग लक्झरी हॉटेल म्हणून लॉटे हॉटेल- सेउल , लिडिंग ब्युटीक हॉटेल म्हणून हॉटेल द आर्टस्- सैगोन आणि हॉटेल दी ला कपल- मागलेरी यांना विभागून देण्यात आले असून लिडिंग एम आय सी इ रिसॉर्ट म्हणून शेरेटन ग्रँड दनांग रिसॉर्ट आणि अंगसान लँग या दोन हॉटेल्स ना मान मिळाला आहे.लिडिंग न्यू हॉटेल म्हणून दनांग गोल्डन बे यांची वर्णी लागली असून, लिडिंग एम आय सी इ हॉटेल हा बहुमान नोवाटेल दनांग प्रीमियर हान रिवर , इंटरकॉन्टिनेटल हॅनाई लँडमार्क ७२ व पुलमान वूऊंग टाऊन हॉटेल अँड कन्व्हेन्शन सेंटर यांच्यात विभागला गेला आहे.

लिडिंग फॅमिली रिसॉर्ट म्हणून नोवाटेल फ्यू क्यूओक रिसॉर्ट आणि मेपर्ल हो टॅन रिसॉर्ट यांना तर सिटाडीयल्स ब्ल्यू क्लोव- दनांग यांना लिडिंग हॉटेल अपार्टमेंट म्हणून व इमराल्ड निन्ह बिन्ह रिसॉर्ट अँड स्पा ला लिडिंग इको फ्रेंडली रिसॉर्ट आणि ऍना मॅन्द्रा व्हीलास दलात रिसॉर्ट अँड स्पा ला लिडिंग लक्झरी माऊंटन रिसॉर्ट चा बहुमान मिळाला आहे.

“दि क्विंटसेन्स ऑफ टोकिन” या सांस्कृतिक कार्यक्रमास सर्वोत्कृष्ट दिमाखदार सोहळा तर , “होई अँन मेमरीज” या कार्यक्रमास सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक सोहळा म्हणून गौरविण्यात आले.
मुयांग थँन ग्रुप च्या जनरल डायरेक्टर मिस ले थी हुअंग येन यांना हॉटेलियर ऑफ द इयर म्हणून सन्मानित केले गेले , तर फ्रॅंक बुचमन , कार्ल गँगनॉन आणि ब्रिट बर्टन या ट्रॅव्हल इंडस्ट्री मधील दिग्गजांचा जनरल मॅनेजर ऑफ दि इयर म्हणून सन्मान करण्यात आला…

————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!