बेल्जियमचे महाराजा व महाराणीचे मुंबईत आगमन
मुंबई : बेल्जियमचे महाराजा फिलिप्पे व महाराणी मथिलदे यांचे आज दुपारी मुंबईत आगमन झाले. विमानतळावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी मुंबईचे महापौर विशवनाथ म्हाडेश्वर , मुख्य सचिव सुमित मल्लीक आदी उपस्थित होते.
