कल्याण  :  एक मुजोर तरुणाने वाहतूक पोलिसाच्या डोक्यात दगडाने मारहाण करीत जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुजोर दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय..

कसा घडला प्रकार 


कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सूरु होती, शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते.  यावेळी राहुल  रोकडे हा तरुण भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात होता ,पटाईत यांनी त्याची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण  राहुल  ने कट मारत तेथून निघून गेला, काही अंतरावर गाडी लावून काही क्षणातच राहुल परत आला ,त्याने पटाईत यांच्याशी हुज्जत घालत त्याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली .या हल्ल्यात पटाईत जखमी झाले असून त्यांच्यावर रुकिमीनीबाई रुग्णलयात उपचार सुरू आहेत .तर पोलिसांनी राहुल  रोकडे याला ताब्यात घेतलं आहे . 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *