ऑक्टोंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू करणार !
ठाणे, अविनाश उबाळे : रब्बी हंगाम शेतीसाठी शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात अधिक मदत व्हावी याकरता जिल्ह्यातील बँकांना सहा कोटी वाटपाचे टार्गेट देण्यात आलेले आहे . ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटप होणार आहे. अद्याप बँकांनी कर्ज वाटप सुरुवात केलेल नाही. आता लवकरच वाटप करण्यात येणार असल्याचे असल्याचे समजते.
पाऊस लहरी झालेला आहे व त्यामुळे जिरायती शेती ही बिन भरवशाची झालेली आहे. दरवर्षी नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान होत आहे. यामध्ये कधी अति पावसाने तर कधी पावसाअभावी पिके हातची जात आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना बँका द्वारा दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाचा आधार मिळाला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाला जिल्ह्यात १९८६०.०० ( लाख ) कोटींचे टार्गेट देण्यात आले होते .त्यासाठी त्यातूनच सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत बँकांनी २१ हजार ४०६ शेतकरी खातेदारांना ११०३९.७८ लाख रुपये कोटींचे पीक कर्ज वाटप केलेले आहे .त्याची टक्केवारी ५५.५९ इतकी आहे. कर्जमाफी झाल्यानंतर सातबारा कोरा झाल्याने बहुतम शेतकऱ्यांनी नव्याने पीक कर्ज घेतले आहे. रब्बीमध्ये पीक कर्जाची मागणी जास्त राहत नाही. त्यात जिल्हा बँकेचे कर्ज वाटप निरंक राहते. याशिवाय राष्ट्रीयकृत बँकांचा देखील हात आखडता घेतला आहे. यंदा रब्बी हंगामात सरासरी मागणी नुसार क्षेत्र ठरणार आहे. तरी देखील काही हेक्टर मध्ये पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सर्वाधिक हेक्टर मध्ये हरभरा राहणार आहे .
खरीपासाठी ६१५७ ( लाख )कोटींचे कर्ज —
यंदाच्या खरीप हंगामासाठी ठाणे जिल्ह्यातील बँकांना ६१५७.०० लाख कर्ज वाटपाचे लक्ष देण्यात आले होते.तर लीड बँकेने कळविलील्यानुसार ते ७७३२.०० ( लाख ) करण्यात आले आहे.
पाचशे कोटींचे वाटप —
रब्बी हंगामासाठी ६१५७.०० लाख पीक कर्ज वाटपाचे लक्ष राष्ट्रीयकृत बँक,ग्रामीण बँक, जिल्हा बँकेला पीक कर्जाचे लक्षांक दिले आहे.
कर्जासाठी बँकेकडून अर्ज स्वीकारणे सुरू —
पिक कर्जासाठी सर्व संबंधित बँकांकडून पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले सुरू झाले आहे साधारणपणे दसऱ्यापासून कर्जवाटप सुरुवात होणार आहे व दिवाळीनंतर कर्ज वाटपाची गती वाढणार आहे.
पिक कर्ज वाटपास सुरुवात —
रब्बी हंगामात अर्जाची मागणी सुरू आहे त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकां द्वारा पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होणार आहे .
यंदा खरिपात पीक कर्ज घेतले आहे .त्याचा भरणा व्हायचा आहे .पहिले कर्जाचा भरणा करा याशिवाय रब्बीसाठी मिळणार नसल्याचे बँकेचे अधिकारी सांगतात. :- प्रवीण भेरे शेतकरी.
यंदा भाजीपाला उत्पन्न घ्यावे लागणार आहे.त्यामुळे रब्बी साठी कर्ज घ्यावी लागणार आहे विचारणा केली तर वेळ असल्याचे सांगण्यात येते.— प्रकाश बोंद्रे शेतकरी.