कल्याण : कल्याण मोहने परिसरातील बँक ऑफ बडोदा शाखेला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली..आगेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीमुळे बँकेत धुराचे लोट पसरले होते त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण निर्माण झाली. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नसून, बँकेतील कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचा पोलीस तपास करीत आहेत.