बालदिनाच्या दिवशी रस्त्यावर भरली शाळा : विक्रमगडमध्ये सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध

विक्रमगड : आज १४ नोव्हेंबर बालदिन म्हणजे बालकांच्या हक्काचा दिवस, राज्यभरात मोठया उत्साहात  साजरा होत असतानाच विक्रमगड तालुक्यातील अलोंडे येथील जिल्हा परिषदेची शाळा रस्त्यावर भरली होती.  शाळेच्या इमारतीच्या अभावीच ही शाळा वाडा जव्हार राज्य महामार्गावर ही शाळा भरविण्यात आली. बालदिनाच्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे सरकारचा नाकर्तेपणा समोर आलाय.

अलोंडे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेगा पडल्या असून कधीही कोसळू शकते अशा अवस्थेत आहे. शाळेची  डागडुज्जी करण्यात आली नसल्याने पावसाळयात चार महिने  ही शाळा घरात भरविण्याची नामुष्की ओढवली होती. शाळेच्या दुस्तीबाबत स्थानिकांनी अनेकवेळा  पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी बालदिनाच्या दिवशी रस्त्यावर शाळा भरवली. विशेष म्हणजे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री इथल्या जिल्ह्याचे आहेत. त्यांच्याकडेही स्थानिकांनी  अनेकदा पत्रव्यवहार केला पण त्यांच्याकडूनही  पदरी निराशाच आली अशी नाराजीची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. विक्रमगड तालुक्यामध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतूने सामाजिक कार्यकर्ता निलेश सांबरे झटत आहेत. त्यांनीही सरकारच्या या उदासीन कृतीचा निषेध केला. मात्र विद्यार्थ्याची शाळा रस्त्यावर भरल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली.. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व पंचायत समिती सभापती यांनी ठिकाणी भेट देऊन पुढील ४ महिन्यांत शाळेची इमारत दुरुस्ती व सुसज्ज करून देण्याचं आश्वासन दिले असल्याची माहिती जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी दिली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!