शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त कल्याणात भव्य अभिवादन रॅली

कल्याण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याणात शिवसेना शहर शाखेतर्फे ‘अभिवादन रॅली’ काढण्यात आली. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात केवळ कल्याण शहरात अशा प्रकारची रॅली काढली जाते.
मुरबाड रोड येथून निघालेल्या या रॅलीमध्ये बाळासाहेबांचा स्वाभिमानी बाणा दर्शवणारी वाक्ये-विचार असणारे अनेक चित्ररथ, आदिवासी बांधवांच्या सुप्रसिद्ध तारपा नृत्यासह कल्याणातील विविध भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले पाहायला मिळाले. मुरबाड रोड ते शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, निलेश शिंदे, माजी सभागृह नेते रवी पाटील, अरविंद मोरे यांच्यासह मनोज चौधरी, अनिल ढेरे आदी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

कल्याणमध्ये बाळासाहेबांना चित्रांच्या माध्यमातून अभिवादन

२२५ शाळांच्या तब्बल ६ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

कल्याण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याणात चित्रकला स्पर्धेेचे आयोजन करण्यात आलं होतं.  यावेळी २२५ शाळांतून तब्बल ६ हजार विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. बाळासाहेबांना चित्रांच्या माध्यमातून  अभिवादन करण्यात आलं. कल्याणच्या ऐतिहासिक काळा तलावाच्या आवारात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. काळा तलाव परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पहिलं स्मारक असून स्मारक परिसर आणि तलावाच्या चारही बाजूंनी एकाच वेळी ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कल्याण डोंबिवलीच्या २२५ शाळांमधील तब्बल ६ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा 4 थी ते 6 वी आणि 7 वी ते 8 वी अशा दोन गटात घेण्यात आली ज्यात ‘स्वच्छ कल्याण डोंबिवली-स्मार्ट कल्याण डोंबिवली, व्यंगचित्रे आणि पाणी हे जीवन हे विषय ठेवण्यात आले होते. बाळासाहेब हे जागतिक किर्तीच्या व्यंगचित्रकार होते त्यांना नमन वाहण्यासाठी चित्राच्या माध्यमातून ही आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला गटनेते रमेश जाधव, ज्येष्ठ नगरसेविका वैजयंती घोलप, स्थानिक नगरसेवक सुधीर बासरे, श्रेयस समेळ, सचिन बासरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *