बदलापूर : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे उल्हासनदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे बदलापूर जलमय झाला होता इमारतीचे तळमजले पाण्याखाली गेल्याने घरातील सामानांचे दुकानांचे आणि वाहनांचे प्रचंड नुकसान झाले वीज व पाणी पुरवठा बंद असल्याने बदलापूर करांचे खूपच हाल झाले २६ जूलै २००५ च्या महापुराच्या आठवणी पून्हा एकदा बदलापूरकरांना दाटल्या.
मुसळधार पावसामुळे उल्हासनदीने साडे सतरा मीटर धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीलगतच्या सखल भाग संपूणपणे पाण्याखाली गेला बदलापूर कल्याण डोंबिवली आदी परिसरात प्रचंड पाणी साचले होते. त्यामुहे नागरिकांची धावपळ उडाली. बदलापूर पश्चिम भागातील रमेशवाडी, मांजर्ली, हेंद्रेपाडा , बाजारपेठ, शनीनगर, मोहनानंद नगर आदी भागातील इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले हेाते . त्यामुळे दुकानांचे, वाहनांचे तसेच घरातील फर्निचर व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. तळमजल्यावरील नागरिकांनी इमारतीत वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये आसरा घेतला.
महालक्ष्मी एक्सप्रेस अडकल्याची आठवण जागी
जोरदार पावसामुळे बदलापूरचे सखल भाग जलमय झाले असतानाच उल्हासनदीचे पाणी रेल्वे रूळ ओलांडून बदलापूर-वांगणी दरम्यान चामटोली येथे रस्त्यावर आले होते. त्यामुळे बदलापूर-वांगणी रस्ताही पाण्याखाली गेल्याने रेल्वे व रस्ता वाहतूकही बंद झाली होती. नागरिकांनी या रस्त्याने प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. सन २०१९ मध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत याच ठिकाणी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकून पडली होती. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानता बाळगण्यात आली होती.