स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता गेला चोरीला

डोबिवली: येथील प्रभाग क्रमांक ६६ आयरे गाव परिसरातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता चोरीला जात असल्याची तक्रार काँग्रेस नेते रवी पाटील यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ग प्रभागक्षेत्र अधिकारी आणि रामनगर पोलिसांना पत्र दिले आहे. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि रस्ता पुन्हा ग्रामस्थांच्या सुविधेसाठी द्यावा असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.
त्या परिसरातील स्मशानभूमी रस्त्याचे काम सुरु असून ते काम करतांना पूर्ण रस्ता उखडण्यात आला आहे. जेसीबीद्वारे माती काढण्यात आली आहे. कच्च्या रस्त्याची माती ठेकेदाराने उचलून नेली असून चांगली माती विकतांना कोणतीही रॉयल्टी देखिल जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना भरलेली नसल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. रस्त्याचे काम करतांना त्याखाली पाण्याच्या लाइन, पथदिवे आदींच्या केबल्स तुटल्याने, त्या परिसरात काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेत अंधार पसरलेला असतो. त्या ठिकाणी दिव्यांसह जलवाहिनीची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून त्याकडे महापालिका प्रशानाने लक्ष द्यावे असे त्यांची मागणी केलीय.
ज्याठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे त्यावर कोणाचेही बंधन नाही गावाकडुन स्मशानाकडे जाणारा एकमेव रस्ता देखिल बंद झाल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी शहरातील अन्य ठिकाणी जावे लागण्याची शक्यता आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, पूर्ण रस्ता बंद ठेवू नये, तसेच संबंधितांची चौकशी करुन नियमांची पायमल्ली झाली असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी पाटील यांनी केलीय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *