ॲट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आदिवासी शेतकऱ्यांची मागणी
कर्जत. दि. १२ : कर्जत तालुक्यातील पळसदरी गृपग्रमपंचायात हद्दीतील तिघर धनगरवाडा येथे रस्त्याचे काम सुरू आहे. सदर काम सुरू करताना प्रशासनाने रस्त्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी भूसंपादन न करता संबंधित ठेकेदार बाधित आदिवासी शेतकऱ्यांची जमीन हाडपण्याचा प्रयत्न करीत असून रजिप बांधकाम विभाग उपअभियंता खिल्लारे त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्याने केला आहे.
तिघर धनगरवाडा या रस्त्यासाठी एम एम आर डी चा माध्यमातून २ कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. सदर रस्ता करताना शासनाने कोणत्याही प्रकारचे भूसंपादन न करता आणि कोणताही आर्थिक मोबदला न देता आमची जमीन हाडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप येथील आदिवासी शेतकरी करीत आहेत. ठेकेदाराने आमची परवानगी न घेता आमच्या शेतात जेसीबी फिरून , खोदकाम करून खडी पसरवली आहे. त्यावेळी आम्ही काम थांबवण्यासाठी गेलो असता तेथील ठेकेदाराने आम्हाला शिवीगाळ केली आणि आमच्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला .त्यावेळी आम्ही कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार केली परंतु गरिबाला कोणी वाली नसतो अशी प्रतिक्रिया बाधित शेतकऱ्यांनी दिली आहे.
या बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी कर्जत तहसीलदार, रजिप बांधकाम विभाग कर्जत उपअभियंता तसेच कर्जत पोलिस ठाणे यांना तक्रार दाखल केली. परंतु दोन महिने होऊन देखील कोणत्याच अधिकाऱ्याने आमची दखल घेतली नसल्याचे अदिवसी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अखेर या आदिवासी शेतकऱ्यांनी आपली व्यथा रायगड जिल्हाधिकारी आणि रायगड पोलिस अधिक्षक यांच्याकडे मांडली आहे. ॲट्रोसिटी कायद्या अंतर्गत संबंधित ठेकेदार आणि रजिप बांधकाम विभाग उपअभियंता खिल्लाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत केली आहे.संबंधित शेतकरी आदिवासी असल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करीत आहेत.
“आम्ही आदिवासी शेतकरी असून आमच्याकडे काही गुंठेच शेती शिल्लक राहिली आहे. त्याही जागेत रस्ता झाला तर आम्ही भूमिहीन होणार आहोत. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा.” ; वंदना भास्कर धानिवले, बाधित आदिवसी शेतकरी
“जमीन भूसंपादन न करता ठेकेदार आणि आधिकरी दमदाटी करून आमची जमीन हाडपण्यचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या तक्रारीची कोणीच दखल घेत नाही”. ; महादेव मरले, आदिवासी शेतकरी
“तिघर धनगर वाडा जोड रस्ता हा तिघर गावाच्या वेशीवरून जाणारा सदर रस्ता प्लॅनवर असताना चुकीच्या पद्धतीने आणि मनमानी करून ठेकेदार सदर रस्ता करू पाहत आहेत”. ; अजय धानीवले, आदिवासी बाधित शेतकरी