कल्याणात जमावाचा  पत्रकारावर जीवघेणा हल्ला

कल्याण  : कल्याण पश्चिमेकडील खाजगी रुग्णालयात एका २२ वर्षीय तरुणाचा आज सायंकाळच्या सुमाराला उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकानी रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा ठपका ठेवत रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी वृत्तांकन करणाऱ्यासाठी गेलेले  एलएनएनचे पत्रकार  केतन बेटावदकर  यांच्यावर जमावाने हल्ला केलाय. केतन हे जखमी झाले असून त्यांना होली क्रॉस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याचा ठाणे जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटनानी निषेध व्यक्त करीत तातडीने हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात राहणाऱ्या रोहित भोईर या तरुणाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरल्याने पत्रकार घटनास्थळी वृत्तांकन करण्यासाठी गेले. यावेळी पत्रकार केतन बेटावदकर यांना संतापेल्या जमावाने हल्ला चढवत रक्तबंबाळ केले. या हल्ल्यात पत्रकार बेटावदकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!