डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वाहन चालक विनोद लंकेश्री या कर्मचाऱ्यावर सोमवारी रात्री ८:३० च्या सुमारास एका व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या बाहेर घडली. हल्लेखोराने त्याच्या हातावर सुऱ्याने सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला आहे.
भर रस्त्यात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर कोण होता व त्याच्यावर हल्ला का करण्यात आला ? हे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.
जखमी विनोद याला तात्काळ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तेथे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. विनोद यांच्या जबानी नंतरच हल्ल्याचे कारण समजू शकणार आहे.