कोरेगाव भीमा हिंसाप्रकरणातील गुन्हे मागे घेणार : ९ कोटी ४५ लाख नुकसान भरपाई सरकार देईल : मुख्यमंत्री
मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात येणार असून, या हिंसाचारात ९ कोटी ४५ लाख नुकसान भरपाई झाली . ती राज्य सरकार देणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेला उत्तर देताना दिली.
जानेवारी महिन्यात भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता यामध्य 60 पोलीस आणि 58 नागरिक जखमी झाली होते . या प्रकरणात एकूण ५८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १६२ जणांना अटक करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिंसाचाराच्या घटनेनंतर १७ अट्रोसिटी आणो ६०० हुन अधिक गुन्हे दाखल झाले. त्यात ११९९ आरोपींना अटक करण्यात आली असून, २ हजार ५३ व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र गंभीर गुन्ह्याबाबत समिती निर्णय घेईल मात्र तीन महिन्यात पोलीस या समितीकडे अहवाल सादर करतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या घटनेच्या ठिकाणी ९ कोटी ४५ लाख नुकसान झाले त्यापैकी दलित समाजाचे १ कोटी तर मुस्लिम समाजाचे ८५ लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेवर यांच्यावर निवेदन करणं टाळलं. मात्र मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला फरार झाल्यावर कॉम्बिग ऑपरेशन केल्याचे त्यांनी सांगितले. संभाजी महाराजांची समाधी राज्यसरकार ताब्यात घेणार असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात कोणाचीही चुकी आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल आव ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Mg nevali prakarn