कल्याण : देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवल्याने एक्ससाईज अधिकारी आणि त्यांच्या पथकावर एक्ससाईज कार्यालया समोरच प्राणघातक हल्ला. झाल्याची धक्कादायक घटना कल्याणात समोर आली आहे या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसानी तिघा आरोपीना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

बाईट : शाहूराजे साळवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळसेवाडी

कल्याण एकसाईज विभागाचे एक्ससाईज अधिकारी सुनील कणसे याना माहिती मिळाली की चिंचपाडा परिसरात एका अल्टो कार मध्ये काही जण देशी दारू घेऊन येणार आहे यांची माहिती मिळाली होती. सुनील कणसे यांच्या सह त्यांच्या पथकाने सदर परिसरात सापळा रचला .यावेळी एक कार आली या कार मध्ये देशी दारू सापडल्याने कारचालक दीपक पगारे याला ताब्यात घेऊन एक्ससाईजचे पथक कल्याण पश्चिमेकडील आपल्या कार्यलयात पोहचले .कार्यलया समोर आधी त्यांची गाडी अडवली आणि नंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवून तुम्हाला कारवाई साठी आम्हीच भेटतो का असा सवाल करत काठी ,लोखंडी सळीने एक्ससाईज च्या पथकावर प्राणघातक हल्ला केला .या हल्ल्यात सुनील कणसे यांच्यासह तीन कर्मचारी जखमी झाले .या झटापटीत मारहाण करणारे टोळीने दीपक पगारे याना घेऊन पसार झाले मात्र टोळीतील काही जणांना पकडून कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले .या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी राजेश चोळेकर ,म्हात्रे याना अटक केली असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत

..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!