गुवाहाटी, 07 डिसेंबर : गुवाहाटीमध्ये गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे ५.४२ वाजता ३.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप जाणवला. भूकंपाची तीव्रता खूपच कमी असल्याने कोणतीही हानी झालेली नाही.
एनसीएसच्या अहवालानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू गुवाहाटीपासून 63 किमी उत्तर-पूर्वेला होता. भूकंप 26.63 अक्षांश आणि 92.08 रेखांशावर 5 किमी खोलीवर होता.