ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अशोक शिनगारे यांनी आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून स्वीकारला.
राज्य शासनाने काल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची बदली नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून केली. त्यांच्या जागेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिनगारे यांची नियुक्ती केली. आज रात्री शिंगारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार नार्वेकर यांच्या कडून स्वीकारला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार राजाराम तवटे, राहुल सारंग, राजेंद्र चव्हाण, ठाणे तहसीलदार युवराज बांगर आदी यावेळी उपस्थित होते.
शिनगारे हे २००९च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम केले आहे. ९ सप्टेंबर २०२० पासून ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून काम पाहत होते.
000