मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्जप्रकरणी न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे त्यामुळे आर्यनला आता तीन दिवस कोठडीतच राहवं लागणार आहे.
क्रुझवर ड्रग्ज पार्टी सरू असतानाच एनसीबीने छापा टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. यानंतर कालच आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती.
आज आर्यनसह इतर सात आरोपींना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आर्यन खानबरोबरच मुनमुन धमेच्या व अरबाज सेठ मर्चंट या दोघांना देखील ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावलीय.
“आरोपीच्या फोन चॅटमध्ये कोड नावं आहेत. याची चौकशी करायची आहे. सत्य शोधण्यासाठी आम्हाला पोलीस कस्टडीची गरज आहे. आज आम्ही एका आरोपीला अटक केलीय. हे लोक एका ग्रुपमध्ये काम करतात. ड्रग्जचं सिंडिकेट शोधायचंय. ही एक गँग आहे, एकाकडून दुसऱ्याकडे जातात,” असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं.
आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली, “आर्यनच्या बॅगमध्ये काहीही मिळालं नाहीय. एनसीबीने त्याचा फोन घेतला. अरबाज मर्चंट हा आर्यनचा मित्र आहे. त्याच्याकडे 6 ग्रॅम चरस मिळाला. इतर आरोपींकडे ड्रग्ज मिळालं. त्या आरोपींना आर्यन ओळखत नाही. त्याचा त्यांच्याशी संबंध नाही.”