मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान याचा पूत्र आर्यनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. ड्रग्ज प्रकरणात आर्यन हा ऑर्थर रोड तुरूंगात आहे. तब्बल २५ दिवसानंतर आर्यन जेलबाहेर येणार आहे. त्यामुळे आर्यनची सुटका होणार असली तरी वडील शाहरूखला खान दिलासा मिळाला आहे. आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरूखच्या चाहत्यांनी मन्नत बंगल्याबाहेर फटाके फोडण्यात आले.
मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना अटक करण्यात आली होती. या तिघांनाही कोर्टाने जामीन मंजूर केलाय. दोन ते तीन दिवसांपासून कोर्टात सुनावणी सुरू होती. या प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी आर्यन, अरबाज आणि मुनमुन या तिघांनी कोर्टासमोर जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले.
आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावलाय. त्यामुळे आर्यनची दिवाळी मन्नतवर साजरी होणार आहे. कोर्टाने जामीन दिला असला तरी कोर्टाकडून संपूर्ण आदेश मिळाल्याशिवाय तिघे तुरुंगातून बाहेर येणार नाहीत, असं आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं आहे.