डोंबिवली/ प्रतिनिधी : स्वामींचे घर अंतर्गत चैतन्यप्रभा मंडळाच्या माध्यमातून समर्थ व्याख्यानमालेचे पाचवे विचारपुष्प सुप्रसिद्ध लेखक.व व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता शाप की वरदान या विषयावर अत्यंत प्रभावीपणे गुंफले..!
संपूर्ण जगात सध्या चॅट जीपीटी ही सोपी गोष्ट शिकून त्यापासून स्वतःचे दैनंदिन आयुष्य सुखकारक करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.याच पार्श्वभूमीवर या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी आणि ते कसे कार्य करते यावर अभ्यासपूर्ण माहिती देताना विवेक मेहेत्रे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता चॅट.जीपीटी.ही अत्याधुनिक प्रणाली काही सेकंदातच जगभरातील सर्वच विषयांवरील माहिती सखोलपणे देते. आरोग्य, शिक्षण, विज्ञान, क्रीडाकला, व्यवसाय, साहित्य राजकारण, समाजकारण, आर्थिक, खरेदी विक्री, व्यक्ती, ज्वेलरी, पाककृती इ. ची माहिती अभ्यासपूर्णरित्या आपल्याला उपलब्ध होते. या पार्श्वभूमीवर हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान समजून घेणे ही आता काळाची गरज आहे.
चॅट जीपीटी च्या मूलभूत गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी हे तंत्रज्ञान कुशलतेने आत्मसात करणे जरुरीचे आहे. तसेच Al चॅट बॉटस् शी अधिक प्रभावीपणे संवाद कसा साधावा याबद्दल सर्व काही मोठ्या पडद्यावर दाखविताना दैनंदिन जीवनात चॅट जीपीटी का व कसे वापरायचे याबद्दल सखोल विवेचन मेहेत्रे यांनी केले.
तसेच मूलभूत गोष्टींपासून ते artificial intelligence चॅट बॉट तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक ट्रेंड बदल सर्व काही पडद्यावर पाहताना प्रेक्षकांच्या चेह-यावर कमालीची उत्सुकता दिसून आली.ओघवत्या व आकर्षक भाषाशैलीत उदाहरणासहीत समजावण्याची खासियत प्रेक्षकांनी विशेष गौरवून त्यांचे अभिनंदन केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना संभाव्य धोक्यापासून काळजीपूर्वक दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय