कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट पाहत उभ्या असलेल्या एका महिला प्रवाशीची छेड काढणा-या रोहित वरकुटे या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. वरकुटे हा कसारा येथे राहणारा आहे. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रोहितला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता रोहितला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात गर्दी असते. या स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा करतात. डोंबिवलीत राहणारी प्रवासी महिला डोंबिवलीहून कल्याणला कामानिमित्त आली होती. ही महिला प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट बघत असताना एका इसमाने तिला धक्का दिला. चुकून धक्का लागला असेल असं महिलेला वाटलं. तिने स्वतःला सावरून तीन नंबरच्या फलाटावरुन सात नंबरच्या फलाटावर गेली. त्या फलाटावरही तोच व्यक्ती तिचा पाठलाग करीत आला. तिने पुन्हा तिच्यासोबत तोच प्रकार केला. प्रवाशांच्या मदतीने फलाटावर असलेल्या पोलिसानी या व्यक्तीला पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *