डोंबिवली : येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाला वाणिज्य शाखेचे ( B.Com )पदवी महाविद्यालय सुरु करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली आहे. टिळकनगर शाळा, ज्यूनिअर काँलेज, गुरुकुल शाळा, भाषावर्धिनी ( चार विदेशी भाषा शिकण्याचे केंद्र) अशा शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबविले जातात. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा आहे असे मंडळाचे कार्यवाहआशीर्वाद बोंद्रे यांनी सांगितलं.
तसेच प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y. B.com ) शाखेत प्रवेश घेण्यासाठी कृपया टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर शाळेतील कार्यालयात सकाळी ११ ते ६ या वेळेत संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी ९८६७२६८९६९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी केले आहे.