डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोबिवली विधानसभेतील वॉर्ड क्र ५१ महाराष्ट्रनगर च्या अध्यक्षपदी तुकाराम माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी आणि कार्याध्यक्ष नंदकुमार धुळे यांनी ही नियुक्ती केल्याचे जाहीर केले. त्याबाबतचे नियुक्तीपत्रही तुकाराम माळी यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे विचार आणि ध्येय धोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माळी यांनी सांगितले. यावेळी १४३, डोंबिवली विधानसभा क्षेत्र.अध्यक्ष सुरेश जोशी, कार्याध्यक्ष रमेश दिनकर, पांडुरंग चव्हाण, भरत गायकवाड, मंगेश जाधव आदी उपस्थित होते.–