कल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण लोकसभा समन्वयक पदी कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या ताब्यात असून, शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मतदार संघाला सुरुंग लावण्यासाठी आतापासून भाजप कामाला लागल्याची दिसून येत आहे.

पक्षाचे संघटनात्मक कार्य रचना या सगळ्या गोष्टींकरिता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभा आणि विधानसभा या क्षेत्रात काम करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या नियुक्त केलेले आहेत त्याचाच भाग म्हणून कल्याण लोकसभा समन्वयक पद शशिकांत कांबळे यांचे कडे आलेले आहे त्यांनी पूर्वी लोकसभेचा विस्तारक म्हणूनही काम पाहिले आहे डोंबिवली विधानसभा प्रमुख संजीव बिरवाडकर, सहप्रमुख मिहिर देसाई ,समीर चिटणीस, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख नंदू परब ,कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख नाना सूर्यवंशी, सहप्रमुख सुभाष मस्के, कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख स्वप्निल काटे, सहप्रमुख गौरव गुजर, संतोष शिंगोळे, अंबरनाथ विधानसभा प्रमुख अभिजीत करंजुले, सहप्रमुख संतोष शिंदे, राजेश कवठाळे अशी ह्या लोकसभेतील रचना असणार आहे.या नियुक्त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रविंद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *