मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयेागाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राज्य सरकारकडून अधिसूचना काढून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. रूपाली चाकणकर या गुरूवारी पदभार स्वीकारणार आहेत.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतानाच महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर नेहमीच टीका केली जायची. अखेर सरकाने रूपाली चाकणकर यांची नियुक्ती केली आहे. याआधी महिला आयेागाच्या अध्यक्षपदी भाजपच्या विजया रहाटकर होत्या. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हे पद रिक्तच होत.
याआधी भाजपाच्या विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. यानतंर हे पद रिमकाम होतं. महिलांवरील अत्याचार वाढत असताना अध्यक्षपदी कोणाचीही नेमणूक होत नसल्याने जोरदार टीका होत होती. या पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण तसंच माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांचं नावही चर्चेत होतं. पण रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.