ठाणे, दि. 30 : कोवीडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 3 ते 18 वयोगटातील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीमधून प्रति बालक दहा हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. हे अर्थसहाय्य मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोवीडमुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी हे अर्थसहाय्य ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीतून देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील कोविड – 19 मुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या वयोगट 3 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रति बालक कमाल मर्यादा 10, हजार रुपये वितरीत करण्यात येणार आहेत. यासाठी परिपूर्ण भरलेला अर्ज, बालकाचे शाळेचे बोनाफाईड, आई/वडील कोविड पॉझिटीव असल्याबाबतचा पुराव्याची छायांकित प्रत, आई / वडील यांचा मृत्यु दाखल्याची छायांकित प्रत, बालक अथवा बालक पालक संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या खात्याच्या पासबुकची प्रत, बालकाचे आधारकार्डची छायांकित प्रत ही आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गायकवाड यांनी कळविले आहे.

या अर्थसहाय्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, संरक्षण अधिकारी कार्यालय अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नियोजन भवन, 2 रा मजला, कोर्ट नाका, ठाणे. (प) 400601 यांच्याकडून अर्जाचा नमुना घेऊन आवश्यक कागदपत्रासह मूळ अर्जासह प्रस्ताव या तीन कार्यालयापैकी एका कार्यालयास जमा करावा. अधिक माहितीसाठी उमेश आहेर व कृष्णा मोरे (मो नं. 9923802428/8329895370) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *