डोंबिवली : अखिल भारतीय औषण विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी जगन्नाथ तथा आप्पा शिंदे यांची सहाव्यांदा निवड करण्यात आली आहे. इंदोर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिंदे यांची सन २०२३ ते २०२६ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निवड झाली आहे. तर संघटनेच्या सरचिटणीसपदी मध्यप्रदेश चे राजीव सिंघल यांना निवडण्यात आले. तर पी.आर. ओ .पदी गुजरातचे जासुभाई पटेल यांची एकमताने निवड झाली. इंदोर च्या ब्रिलीएंट कन्वेंशन सेंटर, येथे सुमारे दीड ते दोन हजार केमिस्ट बांधवांच्या उपस्थितीत या निवडीची घोषणा करण्यात आली. सर्व केमिस्टांनी जगन्नाथ आप्पा शिंदे व सर्व नव निर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.