अखिल भारतीय औषध संघटनेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा आमदार अाप्पा शिंदे यांची निवड

कल्याण : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांची फेरनिवड झालीय. त्यांच्या जेएसएस पॅनलने दणदणीत विजय मिळवला. आमदार शिंदे हे चौथ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झालेत.
आग्रा येथे त्रैवार्षिक निवडणूक पार पडली. आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरेश गुप्ता पॅनल अशी लढत रंगली हेाती. शिंदे यांच्या पॅनलचे सर्व सदस्य निवडून येत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. अाप्पा शिंदे (महाराष्ट्र) यांनी अध्यक्ष, राजीव सिंगल (मध्यप्रदेश) सेक्रेटरी, तर के.के.सेल्वन (तामिळनाडू) खजिनदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून बिहारचे पी के सिंग यांनी काम पाहिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!