मुंबई, अविनाश उबाळे : दसरा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. विविध प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केली जाते.तसेच शस्त्रांची पूजा केली जाते.या सणाला आपट्यांच्या पानांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते.सोने म्हणून आपट्यांची पाने लुटली जातात. आदिवासी ही आपट्याची पाने दाट जंगलातून मुंबई, दादर, ठाणे, कल्याण,डोंबिवलीत येथे विक्रीसाठी आणतात.वर्षातून एकदा का होईना, आपट्याची पाने आदिवासींच्या पोटाची खळगी भरत असल्याने शहापूरच्या गरीब आदिवासींसाठी ही पाने वरदान ठरली आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर,मुरबाड, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर वांगणी,नेरळ, कर्जत, भिवंडी, वासिंद, खर्डी, कसारा, डोळखांब, किन्हवली, टाकिपठार, दहागाव, माहुली, पिवळी कातवाब,अघई, तानसा, टहारपूर, या डोंगर दऱ्या खोऱ्यात वास्तव्य करणारे आदिवासी दरवर्षी विजयादशमीला आपट्याची म्हणजेच शिदाची पाने विक्रीचा व्यवसाय करतात.दाट जंगलातून मेहनतीने खुडून आणलेली ही पाने गोळा करून डोक्यावर त्यांच्या जुड्या वाहिल्या जातात.दसऱ्याच्या एक-दोन दिवस अगोदर ही पाने बाजारात विकायलाआणतात.आदिवासी पुरुष,महिला ही पाने आसनगाव,वासिंद,खर्डी आटगाव,कसारा येथून पुढे कल्याण, डोंबिवली, ठाणे, दादर येथील फूल मंडईत विक्रीसाठी नेतात.प्रचंड मागणी असलेल्या आपट्यांच्या पानांच्या जुड्या बांधून त्याची ५ ते १० रुपयांपर्यंत ग्राहकांना विक्री केली जाते. आपट्यांच्या पानांसोबत तोरण बनविण्यासाठी झेंडूची फुले,भातांची लोंब आंब्याची पाने,आदिवासी विक्रीसाठी आणतात.दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या आपट्याची पानं गरीब आदिवासींना रोजीरोटी मिळवून देत असल्याने दसरा सणातील ही आपट्याची पानं ठाणे व रायगड जिल्ह्यातील आदिवासींसाठी खऱ्या अर्थानं सोने ठरली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!