ठाणे : शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्याची व्यवस्था ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आली असून काल २५ ठिकाणी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी आलेल्या १,१९२ भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये फक्त एकाच व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड़ दिवसाच्या गणपतीचे विसर्जन शनिवारी भक्तीमय वातावरणात पार पड़ले. यावर्षी शहरातील दीड़ दिवसांच्या तब्बल ८,९७९ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. यामध्ये कळवा ९१ , रेवाळे ५३,खारेगाव खाडी ४०, फडकेपाडा खर्डी तलाव ५५, कावेसर तलाव ६१, बाळकुम घाट ३७, रेतीबंदर पारसिक ५५, दातीवली तलाव १०, रेवाळे तलाव १०, गायमुख ३७, रेतीबंदर मुंब्रा ९७, विटावाखाडी ३०, गणेश घाट ०५, खिडकाळी तलाव २९, शंकर मंदिर ४५ , शिवाजी नगर तलाव ६५, मासुंदा तलाव ७०, आंबेघोसाळे ४२, पायलादेवी १०६, तलावपाळी ५२, कोपरी ५९, पायलादेवी ९१, पायलादेवी कळवा खाडी २७ आणि उपवनमध्ये १० भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात आली. दरम्यान महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी उभारण्यात आलेल्या अँटीजन चाचणी केंद्रावर भाविकांनी चाचणी करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.