ठाणे : अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री विशेष मोहिम राबवत अंमली पदार्थ विक्री, अंमली पदार्थ सेवन करणारे गर्दुल्ले आणि मद्यपींवर कडक कारवाई करून १४० आरोपींना अटक करण्यात आलीय.

ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या भागात ही मोहीम राबवण्यात आले. अंमली पदार्थ खरेदी विक्री करणारे, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून असे ९८ गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांनी शहरातील बस स्टॉप, पडक्या इमारती, घरे, बंद वाहने, गर्दुल्ले बसण्याची ठिकाणे, निर्जन स्थळे, गुन्हेगारी वस्त्या, झोपडपट्ट्या, संवेदनशील ठिकाणे, अंमली पदार्थ विक्रीची ठिकाणे आणि सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या बाजूचा परिसर अशा ठिकाणी तपासणी केली.

अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री विशेष मोहिम राबवत अंमली पदार्थ विक्री, अंमली पदार्थ सेवन करणारे गर्दुल्ले आणि मद्यपींवर कडक कारवाई केली. चार तासांच्या विशेष मोहिमेत पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकांनी शहरातील बस स्टॉप, पडक्या इमारती, घरे, बंद वाहने, गर्दुल्ले बसण्याची ठिकाणे, निर्जन स्थळे, गुन्हेगारी वस्त्या, झोपडपट्ट्या, संवेदनशील ठिकाणे, अंमली पदार्थ विक्रीची ठिकाणे आणि सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या बाजूचा परिसर अशा ठिकाणी तपासणी केली. एकाचवेळी झालेल्या या कारवाईमध्ये अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात तब्बल ९३ गुन्हे दाखल झाले असून १४० जणांना अटक करण्यात आली आहे. ( Anti Drugs Drive In Thane Latest News )

वाचा: मलिक-वानखेडे वाद: उज्ज्वल निकम यांनी दिला ‘हा’ धोक्याचा इशारा

ठाणे परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये अंमली पदार्थांचा विळख वाढत असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या ठिकाणी अंमली पदार्थांचे केंद्र निर्माण होऊ लागले आहे. यातून महिला अत्याचाराच्या घटना आणि गंभीर गुन्ह्यांची शक्यता निर्माण होत असल्याने पोलीसांकडून व्यापक मोहीम राबवण्याचे निश्चित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!