शहापूर अविनाश उबाळे
गायक आपल्या गाण्यातून तर चित्रकार आपल्या चित्रातून लेखक आपल्या लेखातून जशा आपल्या मनातील भावना व्यक्त करतो.तशाच प्रकारे कवी आपल्या मनातील भावना कवितातून मांडतो असाच प्रयत्न प्रसिध्द कवी अर्जुन भागा बांबेरे यांनी दंश झालाय काळजाला या आपल्या काव्यसंग्रहात केला आहे.
अवती भोवती डोळ्यासमोर दिसणाऱ्या अनेक चांगल्या वाईट,गोष्टींन मनं अस्वस्थ झालं आणि याचं बारीक निरीक्षण करून अनुभवलेले कटू प्रसंग आठवणींत साठवलेले व मनात असंख्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते शब्द कागदावर उमटले आणि त्याच्या असंख्य शब्दरुपी कविता झाल्या या कविता अगदी मनाला भिडणाऱ्या हदयाला साद घालणाऱ्या आणि मानवी संवेदना जागवणऱ्या आहेत.
काव्य प्रेमींसाठी हा काव्य संग्रह म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे.लहानपणापासून अगदी शालेय जीवनापासून हा कवी जो घडला तो ग्रामीण जडणघडणीतुन गाव खेड्यावर तर कधी शहरात मुक्त फिरताना सहज शब्द सुचत गेले आणि त्याच्या कविता झाल्या असे कवीवर्य अर्जुन बांबेरे सर सांगतात.
अस्सल ग्रामीण मातीतल्या हदयस्पर्शी व मनाला भिडणाऱ्या कविता,ग्रामीण संस्कृतीशी,आई,वडील,बहीण या नात्यातील हदयस्पर्शी ओलावा जपणारा व्यवस्थेतील वास्तव परखडपणे मांडणारा आपल्या गावातील बालपणीच्या आठवणी अनुभवलेले प्रसंग कटू आठवणीत रममाण होऊन ग्रामीण लोकांशी तीथल्या मातीशी नाळ जोडलेल्या कविता अगदी प्रामाणिकपणे रेखांकित करण्याचा व यातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न कवीवर्य अर्जुन भागा बांबेरे सरांनी आपल्या दंश झालाय काळजाला या काव्य संग्रहातून केलेला दिसतो आहे.
कविवर्य,अर्जुन बांबेरे हे शिक्षक सेवेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या कोदणी या खेडेगावात एका आदिवासी कुटुंबात अर्जुन बांबेरे सरांचा जन्म झाला सध्या ते शहापूर तालुक्यातील वेहलोंडे शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.कविवर्य अर्जुन बांबेरे यांचा काही काळ शिक्षणासाठी शहरात गेला ते नोकरी निमित्ताने वासिंद येथे वास्तव्यास आहेत.
एकिकडे शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना कविता लिहिण्याचा छंद पण त्यांनी जोपसाला आहे.ही त्यांची नुसती आवड नाही तर समाजाप्रती वाटत असलेल्या वेदना भावना व्यक्त होत आहेत आपल्या रोजच्या निरिक्षणातून रोज सुचत जाणारी शब्काद रचना त्यांनी गदावर उतरविण्याचा सुंदर असा प्रयत्न केला आहे.कष्टकऱ्यांच्या,गोरगरिबांच्या वास्तवदर्शी जीवनाची इथल्या राजकीय सामाजिक व्यवस्थेने केलेली वाताहात त्यातून झालेली ससेहोलपट आणि या अनुभवातून कवीच्या मनाला आलेली उद्विग्नता यातून मनात सूरू असलेली घालमेल यांस मोकळी वाट करीत अनेक कविता शब्दरुपी कागदावर उमटत गेल्या.
आणि त्यातूनच दंश झालाय काळजाला अशा अप्रतिम काव्यसंग्रहाचा जन्म झाला.बांबेरे सरांच्या बहुतांश कविता ग्रामीण भागातील लोकांच्या वेदना,सल,ग्रामीण भागातील समस्या या प्रकर्षांने विशद करणाऱ्या आहेत.आणि तेवढयाच वास्तवादी आहेत. कितीतरी गोष्टी अचुकपणे टिपत हे विदारक व मन खिन्न करणारं चित्र कवीने आपल्या कवितांतून मोठ्या कौशल्याने आधोरेखीत केलं आहे.
दंश झालाय काळजाला हा काव्य संग्रह पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर यातील कविता वाचण्याची भुक काही संपत नाही असा हा काव्य संग्रह वाचकांनी तर संग्रहीतच ठेवावा असाच आहे .हा काव्यसंग्रह नव्या कवींना व कवी प्रेमींना कायम प्रेरणादायी ठरणारा आहे.दंश झालाय काळजाला या काव्यसंग्रहात एकूण ६९ कवितांचा खजिना काव्यप्रेमींसाठी खुला आहे.काव्यवाचकांना हा काव्य संग्रह वाचताना अक्षरश खिळवून ठेवतो असा हा काव्य संग्रह आहे.
आई, जाणीव, सावध, तिरंगा, बालपण, वणवा, घरटं, सावली, कैवारी, समानता, नाती, काळ, सर, जगणं झालं मुक, जगण्याच्या वाटेवर,काजवा,बाबा,म्हातारपण,छप्परचोर, क्रांती,अशा कितीतरी कविता वाचताना या कविता मनाल अक्षरश भिडतात विचार करायला भाग पाडतात या कविता समाज जीवनाचा ठाव घेतात असा हा काव्य संग्रह परिपूर्ण असा झालेला आहे.आणि हा काव्यसंग्रह वाचण्याचा मोह कोणालाही आवरता येणारा नाही.
जेष्ठ कवीवर्य अशोक बागवे सर यांच्या हस्ते नुकतेच दंश झालाय काळजाला या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले आहे.हा काव्यसंग्रह वाचकांच्या नक्कीच पसंती उतरेल यात तिळ मात्र शंका नाही.