महिला दिनी जन्मलेल्या चार कन्यारत्नांचा सन्मान : अंकुर सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम 

 डोंबिवली :–   जागतिक महिला दिनाच्या दिवशी जन्मलेल्या कन्यांरत्नांचा अंकुर सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्यावर्षीहरी धनादेश व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात जन्मलेल्या चार कन्यारत्नाच्या पालकांसह धनादेश व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अंकुर  सामाजिक संस्थेच्या  माध्यमातून  संस्थेचे सदस्य  तथा मनसेचे  दिनेश हिरामण पाटील  यांच्या वतीने  दरवर्षी या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येते. जनतेमध्ये कन्यारत्नाबाबत जनजागृती व्हावी हा या कार्यक्रमाचा हेतू असलयाचे पाटील यांनी सांगितले.  याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा  हर्षदा  भोसले, खजिनदार दिनेश पाटील आणि सभासद  अरुण  जांभळे,  सिस्टर ईंचार्ज मंगला सोनवणे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षा हर्षदा भोसले म्हणाल्या, जागतिक महिला दिनानिमित्त ज्या मुली जन्माला आल्या आहेत त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!