डोंबिवलीतील बेकायदा बांधकामप्रकरणी : शिवसेना नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा
डेांबिवली : डोंबिवलीत बेकायदा बांधकामांची कामे जोरदारपणे सुरू असतानाच महाराष्ट्र नगरमधील अनधिकृत चाळींविरोधात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आवाज उठवला आहे. अनधिकृत बांधकामावर ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवक म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्त पी. वेलारासू यांना निवेदन देऊन २१ नोव्हेंबर रोजी ह प्रभाग कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिलाय.
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्र ५१ महाराष्ट्रनगरमध्ये न्यू साई आरती चाळीलगत ४० रूम भरणी करून २० खोल्यांच्या ज्योत्याचे बांधकाम सुरू केले आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त पी. वेलारासू , अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. अनधिकृत बांधकामाविरूध्द तक्रार करणे म्हणजे आपला आणि कुटूंबाचा जीव धोक्यात घालून ही मागणी करीत असल्याचेही नगरसेवक म्हात्रे यांनी सांगितले आहे.
Great job….. We need a person like you only…