रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमत्त रूग्णांना फळेवाटप
डोंबिवली :- दि. ०२ ( प्रतिनिधी ) रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमत्त शास्त्रीनगर इस्पितलातील रूग्णांना फलवाटप करण्यात आले. रुग्णालयातील रुग्णांनी आनंदराज यांच्या भावी आयष्यास शुभेच्छा दिल्या.

या शुभप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक आनंद नवसागरे, २७ गाव विभाग प्रमुख आनंद पारदुले, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते, रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी राजीव गुप्ता, ठाणे जिल्हा रिप. युवा सेना अध्यक्ष थाँमस शिंगारे, डोंबिवली शहर महासचिव मिलिंद सालवे , भारतीय बौद्ध महासभेचे शहर संघटक बाबुराव नवसागरे इत्यादि मान्यवर उपस्थित होते. रुग्णालयातील महाकारुणी गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच त्रिशरण व पंचशील या वंदना घेऊन फळवाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या सामाजिक समतेच्या कार्याला त्यांचे नातू आनंदराज यांनी वाहून घेतले आहे.आंबेडकरी चलवलीचा वारसा जपण्याचे कार्य ते करीत आहेत. त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अश्या प्रकारच्या शुभेच्छा आनंदराज यांना उपस्थित मान्यवरांनी दिल्या. रुग्णालयातील महिला वार्डापासून फलवाटपास सुरुवात करण्यात आली.प्रसुती कक्ष , पुरुषांच्या वाँर्डात फल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटण्यात आली. यासमयी समता सैनिक दलाच्या छबुताइ नवसागरे, कुणाल नाईक, दिपक शिंदे, आबाराव खिल्लारे, सर्वेश कांबले रोशन शिंदे, मिलिंद कांबले, महादेश पोलकर, महादेव वाघमारे, अविनाश वाकोडे, ओमकार राणे, संदिप सरफरे,क्षगोगल मंगे, गौतम वाटुरे, सिध्दार्थ टेकाली, युवराज वाटुरे, राकेश शिंदे, सिद्धार्थ मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *