कल्याण : एकिकडे अयोध्देत श्रीराम प्रतिष्ठापना सोहळयानिमित्त देशभरात उत्साह साजरा केला जात असतानाच, दुसरीकडे श्रीराम दर्शनाचे निमित्त साधून भक्तांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. कल्याणात असाच प्रकार उघडकीस आला आहे.आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो अशी बतावणी करीत तीन भामटयांनी एका वृध्द महिलेला २ लाख ६६ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.या प्रकरणी पोलिस ठाण्यात फसवणूकी चा हा प्रकार घडला आहे.

कल्याण पश्चिम येथील खडकपाडा भागातील लोटस डेंटल केअर सेंटरसमोर त्याच भागात राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवारी दुपारी खडकपाडा भागातून पायी जात होती. यावेळी त्यांना तीन भामट्यांनी अडवले. आम्ही राम भक्त आहोत, आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो. यासाठी तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, इतर सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून ठेवा, असे त्या भामट्यांनी महिलेला सांगितले. तिघा भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने जवळील २ लाख ६६ हजाराचा सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळला.आपणास रामाचे दर्शन होत आहे या आनंदात महिला होती.तेवढ्यात तिन्ही भामट्यांनी महिलेला एकाकी सोडून तेथून पळ काढला.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फसगत झालेल्या महिलेने खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी फौजदार तानाजी वाघ आणि त्यांचे सहकारी तिघा फरार भामट्यांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!