कल्याण : कल्याणच्या किल्ले दुर्गाडीच्या जागेवर नाव लावण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात सुयश शिर्के सातवाहन याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

माळशेज नाणेघाट इतर वनक्षेत्र पर्यटन विकास समिती अध्यक्ष शिर्के याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार त्याने एका जमीनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखल मागितला होता. हा अर्ज जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाकडे चौकशीकरीता गेला. त्याठिकाणाहून चौकशी होऊन तो कल्याण तहसील कार्यालयाकडे आला. चौकशी दरम्यान या जागे संबंधी शिर्के याने सादर केलेली कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे दिसून आल्याचे म्हणत कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिर्के याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस आणि तहसीलदारांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!