अमिताभ बच्चन ‘सुपरस्टार ऑफ स्टाईल’पुरस्काराने सन्मानित
मुंबई मध्ये ‘इंडियाज मोस्ट स्टाईलिश अॅवॉर्ड्स’ सोहळा संपन्न
मुंबई : दिल्ली आणि मुंबईतील सहा यशस्वी पर्वांच्या (सिझन) आयोजनानंतर स्टाईलचा सर्वात मोठा उत्सव नव्या रुपात साजरा करण्यात आला. द हिंदुस्तान टाईम्स इंडियाचा मोस्ट स्टाईलिश अॅवॉर्ड सोहळा यशराज स्टुडिओ, अंधेरी(प), मुंबईत आयोजित करण्यात आला होता. ज्यात बॉलिवूड, संगीत, क्रीडा, व्यवसाय आणि राजकारणातील सर्वाधिक फॅशनेबल स्टार्सचा सन्मान करण्यात आला. चित्रपट क्षेत्रातील सर्वच आघाडीच्या कलाकारांनी आकर्षक पोषाख परिधान करून या समारंभाची रंगत वाढवली. त्यामुळे ते देशातील सर्वाधिक हॉट रेड कारपेट ठरले.
पुरस्कार निवडीसाठी सन्माननीय परीक्षक (ज्यूरी) म्हणून चित्रपट निर्माता करण जोहर, फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा, अनामिका खन्ना आणि अंजू मोदी, एफडीसीआयचे संचालक सुनील सेठी, अनिर्बान दास ब्लाह आणि हिंदुस्तान टाईम्स (एचटी) च्या व्यवस्थापकीय संपादक (मनोरंजन) सोनल कालरा यांचा समावेश होता. सोहळ्याची संपूर्ण संकल्पना फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने साकारली. त्याने कोर्ट डेकडन्स-खर्चिक गोष्टींबद्दलचे प्रेम, सुविधा आणि उपभोग्य वस्तू ही थीम त्यासाठी निवडली होती. सोहळ्यासाठी केलेली उदारतापूर्वक अंतर्गत सजावट आणि व्यवस्था या थीमनुसार डिझाईन करण्यात आली होती.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांना ‘सुपरस्टार ऑफ स्टाईल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर शाहीद कपूर आणि दीपिका पदुकोन यांनी ‘इंडियाज मोस्ट स्टाईलिश’ पुरस्कार पटकावला. श्रीदेवी ला ‘स्टाइल लीजेंट फीमेल’ व कमल हसन यांना ‘हॉल ऑफ़ फेम’ आणि रेखा हिला ‘हॉल ऑफ़ फीमेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोनम कपूर हिने ‘ग्लोबल स्टाईल आयकॉन’ पुरस्कार पटकावला. वरूण धवन आणि क्रीती सॅनान यांनी ‘मोस्ट स्टाईलिश युथ आयकॉन’ पुरस्कारावर आपले नाव कोरले. याशिवाय इतर प्रतिष्ठित पुरस्कारांध्ये, शाहीद कपूर आणि मीरा रजपूत यांना बॉलिवूडमधील ‘मोस्ट स्टाईलिश कपल’ घोषित करण्यात आले. आयुषमान खुराना, तापसी पन्नू, जॅकी श्रॉफ, अलका याज्ञिक तबू, हिना खान, परिणीती चोप्रा, कॅटरिना कैफ आदी बॉलिवूड सेलेब्रिटी सोहळ्याला उपस्थित होते. विविध गटांत महत्त्वपूर्ण पुरस्कार पटकावणाऱ्या काही सेलेब्रिटींमध्ये यांचा समावेश आहे.