अमित ठाकरेंकडून ठाण्यातील सभेच्या जागेची पाहणी
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवार १८ नोव्हेंबर रोजी ठाण्यात जाहीर सभा होत आहे. अशोक टॉकीज ते मराठी ग्रंथ संग्रहालय, स्टेशन रोड, ठाणे (प) येथे या सभेचे आयेाजन करण्यता आलंय. मात्र सभेला पोलिसांकडून अजूनही परवानगी मिळालेली नाही. दरम्यान सोमवारी रात्री राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी ठाण्यातील मनसे पदाधिका-यांसह ठाण्यातील सभेच्या जागेची व आसपासच्या परिसराची पाहणी करून पोलिसांशी चर्चा केली.
रेल्वे स्थानक परिसरातील अनधिक़त फेरीवाल्यांना मनसेने पिटाळून लावले आहे. त्याविरोधात मनसेचे जोरदार आंदोलन सुरू आहे. मनसेच्या आंदोलनानंतर रेल्वे स्टेशन परिसर हा मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मनसे आंदोलकांवर पेालिसांकडून केसेस दाखल केल्या जात आहेत या सगळया पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभेचे आयेाजन करण्यात आले आहे. मात्र रस्त्यात सभा घेण्यास पोलिसांनी नकार दर्शविला असून अजूनही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या सभेत राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष वेधलय.